Sunday, 6 May 2018

जरा थांबला असतास’...


अफाट या ‘वाटा’
अफाट हे रस्ते 
‘प्रवास’ तुझा कुठला?
‘ध्येय’ तुझे कोणते?

           जायचे तर होतेच
           जरा ‘थांबला’ असतास
           फुलायचे ‘वय’होते
           जरा फुलला असतास....

जिवंतपणीच जगण्याच्या 
का? ‘आशा’ जाळल्यास 
इतका कठोर झालास ?
सर्व ‘दिशा’ संपवल्यास ....

          शोधायचे कोठे तुला ?
          बघायचे तरी कोठे तुला ?
          केव्हा संपेल ‘प्रवास’ तुझा 
          कधी येशील तु भेटीला.....


(भावाच्या  आठवणीत रचलेली कविता )


-राम
     

No comments:

Post a Comment

“अगर आपके पास कमी है, अगर आप ग़रीबी या रोग के शिकार हैं, तो ऐसा इसलिए है क्यूँ की आप अपनी शक्ति पर यक़ीन नहीं करते हैं या उसे समझते नहीं है...