Sunday, 6 May 2018

श्वास जरी घेत असले”

‘श्वास’ जरी घेत असले प्राण-प्राण तुझा आहे
तुजविन जरी जगत असले; जगणे सुद्धा ‘मरण’आहे

‘वाट’ जरी चालत असले, मार्ग मात्र तुझा आहे
तुजविन जगण्यातला ‘अट्टहास’ देखील तुझा आहे

हाक जरी देत असले, नाव मात्र तुझे आहे
तुच दिसतो जिथे-तिथे, मनी तुझा ‘भाव’आहे

उमलली जरी पाकळी, ‘स्पर्श’मात्र तुझा आहे
तुच उगवले रोपटे नवे, ‘आधार’ही तुझा आहे 

सुकली जरी ‘फुले’ सगळी, गंध मात्र शाबुत आहे
ऊगा कशाला घाबरतोस, जन्म-जन्म तुझा आहे


-राम 

No comments:

Post a Comment

“अगर आपके पास कमी है, अगर आप ग़रीबी या रोग के शिकार हैं, तो ऐसा इसलिए है क्यूँ की आप अपनी शक्ति पर यक़ीन नहीं करते हैं या उसे समझते नहीं है...