Friday, 18 May 2018

अंत.......एका संघर्षमयी जिवनाचा 

किशोर शांताबाई काळे 
(MBBS,MD)
Author,Socialist

( किशोर शांताबाई काळे यांच्या स्मरणार्थ.....पेशान डॉक्टर, लेखक,कवी व समाजसेवक असलेला किशोर समाजाचं खुपच आगळं वेगळ परंतु वास्तव रूप होता, अतिशय काठीनं परिस्थतीत जुन्या रूढीवादी समाजात जन्माला येउनही त्याने आपला जिवनलढा यशस्वी करून दाखवला.....आपले वडील कोन हे माहीती नसलेला व्यक्तीच समाजात काय होतं हे आपण सगळेच जाणतो म्हणून किशोर ने वडीलां ऐवजी आईच नाव लाऊन एका नवीन परंपरेची देखील सुरूवात केली,अर्थातच खुप संकटांचा सामना किशोर काळे यांनी केला असणारच.....

अवघया वयाच्या ३५ व्या वर्षी रोड अपघातात त्यांचा दुर्दैवी मुत्यु झाला.

त्यांची काही प्रसीद्ध प्रकाशित पुस्तके - कोल्हाटयाचं पोर, 'हिजडा-एक मर्द', आणि मी डॉक्टर झालो, आयुर्वेदीक औषधी.....

त्यांच्या झंझावाती जीवन प्रवासाला अखेरची मानवंदना व श्रद्धांजली....!!!!



“अंत”............एका संघर्षमयी जिवणाचा

संघर्षमयी मनाचा 
'ध्यास'शांत झाला
एका सुसाट 'वादळाचा'
कसा अचानक अंत झाला ?

'घोर' लावुनीया जिवाला
झोप बेचिराख केली,
घनघोर 'काळोखावर'
एकट्यानेच मात केली....


नियतीने घडवलेला
तो धाडसी 'मर्द' होता,
संवेदनशील मनाचा
'अनोखा' दरद होता.....

जगणे त्याच्या 'विचारांचे'
खरोखर जगणे होते,
कोंडलेलय् मनाचे 
श्वासाविना तगणे होते.....

'आयुषयाला' तुझ्या दिवाणया
लाख-लाख सलाम माझा
सोनेरी पावलांना तुझ्या 
सोनेरी 'सलाम' माझा.......



-राम

No comments:

Post a Comment

“अगर आपके पास कमी है, अगर आप ग़रीबी या रोग के शिकार हैं, तो ऐसा इसलिए है क्यूँ की आप अपनी शक्ति पर यक़ीन नहीं करते हैं या उसे समझते नहीं है...