Saturday, 5 May 2018

सकाळ झाली आता”

स्वप्नातलया खेळण्याचा नाद सोडं आता
ऊठ जरा, डोळे उघड, सकाळ झाली आता, 

अंधारातले जगणे तुझे किती काळ टिकनार ?
वास्तवातले विश्व तुला एक दिवस दिसनार,
पाण्यावरचे बुडबुडे सारे, नको घोर करू त्याचा 
ऊठ जरा,डोळे उघड, सकाळ झाली आता....

काळोखाच्या ऊरात शोधीशी, आकाशातील ‘तारे’
घटिका भराची ‘संगत’ त्यांची होतील बेघर सारे,
‘स्वप्नपुरतीच्या’धयासापोटी वेडा होऊ नकोस असा,
ऊठ जरा, डोळे उघड, सकाळ झाली आता....

आळवशील किती काळ तुझे ‘शब्द’ मंतरलेले,
शब्दांतुनच शिकलो, जगलो शब्दांनीच मारले,
शब्दांच्याच जाळया मधला होशील ‘सावज’ आता
ऊठ जरा,डोळे उघड सकाळ झाली आता......


                                                          -राम

No comments:

Post a Comment

“अगर आपके पास कमी है, अगर आप ग़रीबी या रोग के शिकार हैं, तो ऐसा इसलिए है क्यूँ की आप अपनी शक्ति पर यक़ीन नहीं करते हैं या उसे समझते नहीं है...