Monday, 14 May 2018

शपथ तुला मातीची....’

‘व्यर्थ’का हो,बलिदान त्यांचे,
व्यर्थ का हो, प्राण.....
देशहितासाठी पुसतो तुम्हास,
कुठयं ? आपुला देश अभिमान....

उपाशी राहुन स्वःता ज्यांनी,
चारली ‘भाकरी’भुकेलयांना,
अन्याया विरूद्ध लढण्यास,
पिळ पाडली ‘आतडयांना’ 

देशा खातर ‘अंदमान’गाठले
शिक्षा भोगुनी काळया् पाण्याची 
विझता-विझवता विझली, नाही
‘ज्वलंत’आग देश भक्तीची......

‘स्वाभिमानाने’पेटुनीया उठला 
दिसतां सावट स्व:धर्मा वरती 
हल्ला बोल, म्हणत चढला,
मंगल पांडे, ‘फासा’वरती......

थेंब-थेंब रक्ताने ज्यांच्या,
‘पावन’ झाली धरती,
‘रक्षण’ करण्यां मात्रूभुमिचे
बनला भगत सिंग रंगबसंती....

‘देशप्रेम’जागवं तुझ्यातलं,
चल ऊठ, घे, ‘मशाल’हाती;
संपवून टाक देशद्रोही विचारांना,
‘राम’शपथ तुला तुझ्या मातीची 



-राम

No comments:

Post a Comment

“अगर आपके पास कमी है, अगर आप ग़रीबी या रोग के शिकार हैं, तो ऐसा इसलिए है क्यूँ की आप अपनी शक्ति पर यक़ीन नहीं करते हैं या उसे समझते नहीं है...