Saturday, 5 May 2018

भीजलो चिंब तुझ्यासाठी”

भीजलो ‘चिंब’तुझ्यासाठी,
सगळं काही सोडुन आलो फक्त तुझ्यासाठी,
तु मात्र येता-येता राहिलीस;
का ? तुला नाही वाटले यावे माझ्यासाठी

पावसाच्या त्या ‘भयान’राती
उभा होतो, ‘बकुळाच्या’झाडापाशी
तुझ्याच शब्दांचे ‘आभाळ’ पांघरून ,
तुला शोधत होतो उंच क्षितीजापाशी

‘मनाला’वेड्या कायम ‘आस’तुझ्या येण्याची
काळजाची ‘धडधड’अन् डोळयांची हुरहूर वाढे सरी सारखी
शेवट पर्यंत वाटत होते येशील तु लख्ख ‘विजेसारखी’
बघता बघता वाट तुझी ‘नयन’ माझे थकले.......

सांग, प्रिये का? खेळलीस माझ्या नाजुक भावनांशी......




-राम


No comments:

Post a Comment

“अगर आपके पास कमी है, अगर आप ग़रीबी या रोग के शिकार हैं, तो ऐसा इसलिए है क्यूँ की आप अपनी शक्ति पर यक़ीन नहीं करते हैं या उसे समझते नहीं है...