Saturday, 5 May 2018

क्षणभराची पिरती”


क्षणभराचा’ खेळ सगळा, क्षणभराची नाती
तरी आसुसते ‘जीव’सगळा, क्षणभराची पिरती 

कोण आपुला, कोण परका, नची कळली महती ,
‘साज’ बदलुनीया जो तो छळतो, क्षणभराची पिरती

फुलांसारखे जपले तुजला काय ? आमुची गलती 
काटे सोसले, ‘विरह’ सोसतो, क्षणभराची पिरती,

सांज सकाळी भलत्या वेळी  ‘प्राणप्रियाची’ आरती
‘भास’ म्हणावं की, वेड म्हणावं क्षणभराची पिरती 


-राम

No comments:

Post a Comment

“अगर आपके पास कमी है, अगर आप ग़रीबी या रोग के शिकार हैं, तो ऐसा इसलिए है क्यूँ की आप अपनी शक्ति पर यक़ीन नहीं करते हैं या उसे समझते नहीं है...