Monday, 25 June 2018

डाॅ. शयामा प्रसाद मुखर्जी (06-July-1901- 23-June 1953)

डॅा. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्त पुन्हा एकदा वेगवेगळ्या राजकिय चर्चा जोर धरु लागल्या आहेत. डाॅ शयामा प्रसाद मुखर्जी जम्मु काश्मीरला मिळालेल्या विशेष राज्याचा दर्जाच्या प्रखर विरोधात होते व संपुर्ण आयुष्य ते भारताची एकता व अखंडत्वाचे प्रसारक व प्रचारक राहिले. आर्टिकल ३७० चा त्यांनी काॅंगेस सरकार मध्ये असताना व बाहेर पडल्यावर देखील कडाडून विरोध केला.

आजची वस्तुस्थिती बघता जम्मु काश्मिर राजकिय दुकानदारी बनलय, अलगाववादी नेत्यांची एक फौज, कॅंगरेसी विचार सरणीची एक फौज तर पाकिस्तान धार्जिणया विचारसरणीची एक फौज, उत्तर कुनालाच नको आहे, फक्त प्रश्न निर्माण करायचे बस.

अखंड भारत,एक भारत आपण जेंवहा म्हणतो त्याचाच अर्थ सर्वांना एकसमान अधिकार व हक्क, मग काश्मीरलाच विशेष दर्जा देण्यामागची कारण नेमकी कोणती होती ? का सगळ्या रियासती कुठल्याही अटीवीना भारतात विलीन झाल्या शिवाय काश्मीरच्या ? का काही स्वार्थ साधण्याचा काही राजकिय डाव तर नव्हता ? असे कितीतरी असंख्य प्रश्न  काश्मीर बद्दल कायम मनांत येत राहतात.

मग डॅा. शयामा प्रसाद मुखर्जींचा संदिग्ध अवस्थेत झालेला मृत्यू देखील असंख्य प्रश्न निर्माण करतो, आपल्या देशात  लाल बहादुर शास्त्री, सुभाष चंद् बोस सारखे अनेक विद्वान नेते रहस्यमय रितया् संशयास्पद अवसथेत काळाच्या पडदय आड गेले त्याची कुठल्याही कॅंगेसी नेत्याला कधीच हळहळ वाटली नाही. 

डॅा. शयामा प्रसाद मुखर्जींच कार्य खुप मोठ होत, अखिल भारतीय हिंदु महासभा ते भारतीय जन संघाची स्थापना, त्यांनी कायम एक भारतचा नारा दिला, भारताची अखंडता व एकता टिकावी एवढीच त्यांची इच्छा होती. हे खरे देशाचे नायक होते ज्यांना कुठल्याही स्वार्था विना आपल संपुर्ण आयुष्य देशहितासाठी कारणी लावल, परंतु आपणाला इतिहास चुकिच्या पदधतीन सांगितला व शिकवला जातो व आपण तो डोळ्यावर पट्टी लावून मान्य देखील करतो.




-राम




No comments:

Post a Comment

“अगर आपके पास कमी है, अगर आप ग़रीबी या रोग के शिकार हैं, तो ऐसा इसलिए है क्यूँ की आप अपनी शक्ति पर यक़ीन नहीं करते हैं या उसे समझते नहीं है...