Tuesday, 19 June 2018

भारत-काश्मीर-पाकिस्तान वाद  (एक फसलेला पेच)

आज झी न्युज चॅनल वर काश्मीर प्रश्न व त्याबद्दल संयुक्त राष्ट्राची असलेली भुमिका बघत होतो, आणि वस्तुस्थिती बघुन एक गोष्ट मात्र नक्कीच जाणवली ती म्हणजे, शेजारच राष्ट्र चोर तर चोर पण किती शिरजोर ? आणि त्या पेक्षाही भयानक गोष्ट अशी की, कायदयाने आपला हक्क असुन देखील काश्मीर प्रश्ना बाबत आपल्या तथाकथित प्रस्थापित राजकीय नेते मंडळींनी घेतलेली भुमीका खरोखर संशयास्पद वाटली नाही तरच नवल...

त्याच कारण असं की, पाकव्यापत काशमीर बद्दल आपण कितीदा बोलतो जो की, भारताचा अधीकृत भाग असुन देखील पाकिस्तानने हल्ला करुन बळकावला जो आजपर्यंत त्यांच्याच तांब्यात आहे ? दुसर असं की,  अक्साई चिन जो आता चिनचा भाग आहे आपण आपला मालकी हक्क असलेला परदेश असाच सोडला आणि त्यांवर एक शब्द देखील उच्चारत नाहीत आणि या उलट पाकिस्तान बघा काश्मिर और काशमीरीयोंकी आजादीचे नारे देत जगभर फिरतोय, बर गंमत अशी आहे की, आपल्या कडील काही बुदधीजिवी काश्मिर प्रश्ना बाबत जनमत संग्रह करावा असं जेव्हा बोलतात तेंव्हा तर टाळकच सरकत का करावा ? कशासाठी ? 

काशमिरचे भारतात विलीनीकरण त्यावेळचे तत्कालीन राजवटीचे शासक स्वःता राजा हरी सिंह यांनी त्यांच्या स्वाक्षरीने केले आहे व ते ही पाकिस्तानी हल्ले रोखण्यासाठी आणि त्यांच्या इचछेनुसार काश्मीर भारताचा घटक बनले इतर संसथानानुसार, त्याचे भरपुर पुरावे उपलब्ध आहेतच की, तर मग काश्मीर पाकिस्तानचा घटक कसा होणे शक्य आहे ?
पाकिस्तानी हल्ल्या नंतर संयुक्त राष्ट्राने स्पष्ट शब्दात शांततेचे अवाहन करुनही पाकिस्तान कधीही शांत राहिला नाही या उलट संयुक्त राष्ट्राने घालुन दिलेले नियम व अटी अक्षरशा: पायदळी तुडवुन छातीठोक पणे वावरत आहे.

कधी-कधी तर पंडीत नेहरुंची काश्मीर बददलची भुमीका देखील संशयास्पदच वाटते, आपलं सैन्य स्वबळावर पाकिस्तानी सैन्याला काश्मिर मधुन हाकलून लावत होतं , गरज नसतांना संयुक्त राष्ट्रची मध्यस्थी ओढवून घेतली आणी आपलं दुखणं चव्हाटयावर आणलं, नाहीतर काश्मिरचा वाद तेंव्हाच मिटला असतां...

असो, जे घडले ते तर आपण नाही बदलु शकत पण आता तरी राजकीय इच्छाशक्ती दाखवा आणि या प्रश्नाच राजकारण न करता कायमच उत्तर शोधा म्हणजे मीळवल....



राम 

No comments:

Post a Comment

“अगर आपके पास कमी है, अगर आप ग़रीबी या रोग के शिकार हैं, तो ऐसा इसलिए है क्यूँ की आप अपनी शक्ति पर यक़ीन नहीं करते हैं या उसे समझते नहीं है...